नाशकात रंगणार टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार
नाशिक, 26 जुलै, (हिं.स.) नाशिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात आज शनिवार दि २७ जुलै २०२४ रोजी टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार रंगणार असून नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांचा कसब लागणा
आज रंगणार टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार


नाशिक, 26 जुलै, (हिं.स.) नाशिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात आज शनिवार दि २७ जुलै २०२४ रोजी टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार रंगणार असून नाशिककर स्पर्धक बरोबर बाहेरील शहरातून आलेल्या स्पर्धकांचा कसब लागणार आहे . फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ( एफ एम एस सी आय ) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार होणार आहे .

या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , तसेच जी एस टी विभागाचे अधिकारी दशरथ नवले ,सारूळ चे उपसरपंच सदानंद नवले , गजानन स्टोन क्रशरचे संचालक गजानन नवले ,गॉड स्पीड रेसिंगचे श्याम कोठारी , भाऊसाहेब ढगे ,भरत नवले याच्या हस्ते औपचारिक उदघाटन करण्यात आले . प्रख्यात दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटार कंपनी चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेली हि स्पर्धा नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे . या स्पर्धेमध्ये टी व्ही एस रेसिंगचे शमीम खान ,सय्यद आसिफ अली , कार्तिक एन तसेच मागील वर्षीचा विजेता व्यंकटेश शेट्टी यांचा सहभाग निश्चित झाल्याने स्पर्धेमधील चुरस वाढणार आहे .

नाशिक मधील निलेश ठाकरे , हितेन ठक्कर , मुन्ना अन्सारी , दर्शन चौरे , देवेंद्र गुंजाळ तसेच महिला गटात मागील वर्षाची विजेता पूजा खरे , गीता पाटील या स्पर्धकांचा विशेष सहभाग निश्चित झाला आहे .

हि स्पर्धा एकूण ५० कि. मी . होणार असून त्यामध्ये २४ किलोमीटर हे स्पर्धात्मक अंतर असणार आहे . एफ. एम. एस. सी. आय. चे निकष पाळले जात आहेत यावर देखरेखीसाठी अधिकारी म्हणून समीर बुरकुले यांची तर वाहन तपासनीस म्हणून अंकित गज्जर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

प्रत्यक्ष स्पर्धेला शनिवारी दि २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता केव्हज् काऊंटी येथून सुरवात होईल . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख गणेश लोखंडे , तसेच हर्षल कडभाने , सुरज कुटे ,कौस्तुभ मत्से ,अनिष नायर ,आनंद बनसोडे , अमित बेलगावकर , अमित सूर्यवंशी , युवराज यादव , भूपिंदर सैनी , विक्रम राजपूत यांच्या बरोबर इतर सहकारी काम बघत आहेत .

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI / हर्षदा गावकर


 rajesh pande