अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
अमरावती, 26 जुलै, (हिं.स) प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून अकोला कडे परतणाऱ्या दोघांवर काळाने झळप घेतली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर विरुद्ध दिशेने कार चालवल्याने समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या दोघांचा अं
राष्ट्रीय महामार्गावर गौरी इन हॉटेल समोर भीषण अपघातात दोघांचा अंत


राष्ट्रीय महामार्गावर गौरी इन हॉटेल समोर भीषण अपघातात दोघांचा अंत


अमरावती, 26 जुलै, (हिं.स)

प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून अकोला कडे परतणाऱ्या दोघांवर काळाने झळप घेतली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर विरुद्ध दिशेने कार चालवल्याने समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या दोघांचा अंत तर इतर गंभीर जखमी झाले. मृतक एकाराष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गौरी इन समोर कारचा भीषण अपघात घडला. प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरिता अकोला येथून वॅगनार कारने पाच इसम आले होते. या दरम्यान प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार आटोपून गौरी इन हॉटेल येथे जेवण करायला गेले. तेथून जेवण झाल्यानंतर अकोला मार्गाकडे जात असताना कार चालकाने आपली कार विरुद्ध दिशेच्या मार्गावरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिव्हिल लाईन मोठी उमरी जिल्हा अकोला येथे राहणारी 50 वर्षीय विजय जगन्नाथ मदनकर 36 वर्षीय नकुल विजय तोडकर मृत्यू झाला. तर संदीप माणिक गावंडे मुकेश सराफ यासोबतच एक इसम सुद्धा गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ सह गाडगे नगर पोलीस तात्काळ दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृतक एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी होते अशी माहिती समोर येत आहेत. दोन्ही मृतकाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. धडक कोणत्या वाहनाने दिली याशोधात नांदगाव पेठ पोलीस लागले आहेत.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / मेघा माने / हर्षदा गावकर


 rajesh pande