पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या चालकाला कैदीची शिक्षा
नाशिक , 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। - वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या चालकाला एक वर्षाची कैद व दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात वाहतूक शाखेचे कर्मचारी गोरख पांडूरंग फड यांनी फिर्
पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या चालकाला कैदीची शिक्षा


नाशिक , 17 ऑक्टोबर, (हिं.स.)।

- वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या चालकाला एक वर्षाची कैद व दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयाने सुनावली आहे.

या प्रकरणात वाहतूक शाखेचे कर्मचारी गोरख पांडूरंग फड यांनी फिर्याद दिली होती. फड ६ फेब्रुवारी २०१९ रोजी वाहतूक सप्ताह निमित्त भोसला कॉलेज भागात बेशिस्तांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली होती. भरधाव जाणा-या आरोपी कड याचे वाहन अडविल्याने हा वाद झाला होता. संतप्त कड याने फड यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली तसेच त्यांना ढकलून दिले होते. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.आर.साबळे यांनी केला. हा खटला कोर्ट क्र.९ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश एम.आय.लोकवाणी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अ‍ॅड.अपर्णा पाटील, जगदिश सोनवणे व त्र्यंबकवाला यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला एक वर्ष साधा कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande