बाळ अदलाबदली प्रकरणी सात डॉक्टरांसह परिचारिका निलंबित
नाशिक , 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे नांदूरनाका परिसरातील रूति
बाळ अदलाबदली प्रकरणी सात डॉक्टरांसह परिचारिका निलंबित


नाशिक , 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे

नांदूरनाका परिसरातील रूतिका महेश पवार ही महिला प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या महिलेने रविवार (दि.१३) रात्री ११.३० च्या सुमारास बाळाला जन्म दिला. बाळ पुरुष जातीचे असल्याचे परिचारिकांनी नातेवाईकांना सांगितले. प्रसूती कक्षातील रजिस्टरवर तशी नोंदही करण्यात आली. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला एसएनसीयू कक्षात हलवून उपचार सुरू करण्यात आले. बाळाच्या पोटात पाणी असल्याने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिला.मंगळवारी रात्री नातलगांनी डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली. एसएनसीयूमध्ये बाळाचे डायपर बदलताना हातात असलेले बाळ मुलगा नव्हे तर मुलगी असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. आम्हाला मुलगा झाला असताना मुलगी कशी देता? असा सवाल करीत त्यांनी उपस्थित परिचारिकांना जाब विचारला. परंतु हे तुमचेच बाळ आहे असे परिचारिका सांगू लागल्या. नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील नोंदी तपासण्याची मागणी केली. रुतिका पवार यांच्या नावापुढे मुलगा झाल्याची नोंद होती. काहीतरी चुकीचे घडत आहे असे निदर्शनास आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तेथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती.

याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने गुरुवारी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेला निलंबित केले आहे यामध्ये डॉक्टर वैशाली बिरारी अधी परिचारिका भाग्यश्री येवलेकर, डॉक्टर वाम देवेंद्र, सदक, आणि किरण पाटोळे, छाया निकम, डॉक्टर समृद्धी अहिरे डॉक्टर कन्नोर, जयेश दाभाडे यांचा समावेश आहे याबाबतचे लेखी पत्र गुरुवारी या सर्वांना देण्यात आले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे याची घोषणा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande