बेकायदा गॅस अड्ड्यावरती पोलिसांचे छापे
नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। - खडकाळी सिग्नलच्या बाजूला मिल कंपाऊंडच्या आवारात सुरू असलेल्या घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या बेकायदा गॅस अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस शि
बेकायदा गॅस अड्ड्यावरती पोलिसांचे छापे


नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

- खडकाळी सिग्नलच्या बाजूला मिल कंपाऊंडच्या आवारात सुरू असलेल्या घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या बेकायदा गॅस अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस शिपाई योगेश माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी नाविद अखतार काजी (वय ३८, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) व शाकीर मोहंमद शहा (वय २५, रा. सुंदरनगर, देवळाली गाव) हे दोघे जण घरगुती वापरासाठी असलेले गॅस भारत गॅस व एच. पी. गॅस कंपनीचे भरलेले व रिकामे गॅस सिलिंडर खडकाळी सिग्नलच्या बाजूला मिलच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या बाळगताना मिळून आले. हे दोघे आरोपी हा घरगुती वापराचा गॅस खासगी वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करून नाविद काझी याच्या कब्जातअसलेले २६ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे १३ गॅस सिलिंडर, ६९ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे ६९ गॅस सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे १२ रिकामे गॅस सिलिंडर, ५ हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी लागणारा इलेक्ट्रिक पिस्टन, पाच हजार रुपये किमतीचा एलपीजी गॅस भरण्यासाठी लागणारा पिस्टन व त्याला संलग्न लोखंडी स्टॅण्ड, चार हजार रुपये किमतीचे दोनइलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल, तर दुसरा आरोपी शाकीर शहा याच्या पत्र्याच्या शेडमध्ये सहा हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे तीन गॅस सिलिंडर, ३८ हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे ३८ रिकामे सिलिंडर, ३७ हजार रुपये किमतीचे घरगुती वापराचे एच. पी. कंपनीचे ३७ सिलिंडर, ३० हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे व्यावसायिक वापराचे रिकामे १५ गॅस सिलिंडर, चार हजार रुपये किमतीचे एच. पी. कंपनीचे दोन व्यावसायिक रिकामे गॅस सिलिंडर, पाच हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठीचा इलेक्ट्रिक पिस्टन, पाच हजार रुपये किमतीचा लोखंडी स्टॅण्ड असलेला कमर्शिअल इलेक्ट्रिक पिस्टन, पाच हजार रुपये किमतीचा मोटार स्टॅण्ड असलेला लोखंडी पिस्टन, आठ हजार रुपये किमतीचे चार इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा १ लाख ४३ हजार रुपये मिळन दोन्ही आरोपींच्या कबजातून एकूण २ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी घरगुती गॅस खासगी वाहनांमध्ये भरण्याचा अवैधरीत्या सुरू असलेला अड्डा उद्ध्वस्त केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नाविद काजी व शाकीर शहा या दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande