देवरूख महाविद्यालयात आंतरमहाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धा
रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग तिसरे वर्ष असून ही स्प
देवरूख महाविद्यालयात आंतरमहाविद्यालय बॅडमिंटन स्पर्धा


रत्नागिरी, 12 सप्टेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग तिसरे वर्ष असून ही स्पर्धा महाविद्यालयाच्या सुलभा आपटे क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे.

स्पर्धेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील विविध पदवी महाविद्यालयांमधील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे मंगेश प्रभुदेसाई आणि सहकाऱ्यांचे तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या नियोजन व मार्गदर्शनानुसार उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि जिमखाना प्रमुख डॉ. अमित वराळे, तसेच जिमखाना समितीतील सदस्य मेहनत घेत आहेत.

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande