मुंबई : महाराष्ट्र चॅम्पियन्स स्केटिंग स्पर्धेत अद्विका पालांडेला २ कास्य पदके
मुंबई, 14 जानेवारी, (हिं. स.) : रोलर अथलेटिक महाराष्ट्र राज्य चॅम्पियन्स स्पर्धेत चारकोप (कांदिवली) येथील कुमारी अद्विका अभिजित पालांडे हिने दुहेरी स्पर्धेत २ कास्य पदके पटकावली. कुमारी अद्विका ही विबग्योर स्कूलमध्ये चौथीमध्ये शिकत आहे. ही स्पर्धा वि
अद्विका  पालांडे


मुंबई, 14 जानेवारी, (हिं. स.) : रोलर अथलेटिक महाराष्ट्र राज्य चॅम्पियन्स स्पर्धेत चारकोप (कांदिवली) येथील कुमारी अद्विका अभिजित पालांडे हिने दुहेरी स्पर्धेत २ कास्य पदके पटकावली. कुमारी अद्विका ही विबग्योर स्कूलमध्ये चौथीमध्ये शिकत आहे. ही स्पर्धा विरार (जि. पालघर) येथे आयोजित करण्यात आली होती. अद्विकाने हे यश सततचा सराव, कठोर परिश्रम करून प्राप्त केले. या यशाबद्दल अद्विकाचे तसेच तिच्या आईवडिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यापूर्वी तिने विविध स्केटिंग स्पर्धा जिंकून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सरस्वती परिवाराचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर कदम यांनीही अद्विकाचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande