लोणी काळभोरमध्ये टँकरमधून इंधन चोरणारी टोळी गजाआड
पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। लोणी काळभोर भागातील हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या कंपन्यांच्या आगारातील टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सोलापूर रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. चोरट्यांकडून एक हजार ६२० लिटर डिझेल, टँ
लोणी काळभोरमध्ये टँकरमधून इंधन चोरणारी टोळी गजाआड


पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। लोणी काळभोर भागातील हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या कंपन्यांच्या आगारातील टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सोलापूर रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली. चोरट्यांकडून एक हजार ६२० लिटर डिझेल, टँकर असा ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभम सुशील भगत (वय २३, रा. थेऊरफाटा), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१), रवी केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती), विशाल सुरेश गोसावी (वय ३०, रा. थेऊरफाटा), किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१, रा. कदमवाकवस्ती), रोहीत कुमार (वय २१, रा. बोरकरवस्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी टँकरमालक श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुंबे, तसेच प्रवीण सिद्राम मडीखांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. लोणी काळभोर भागातील कदमवाकवस्ती भागात हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपनीचे आगार आहे. तेथून टँकरमध्ये पेट्रोल-डिझेल भरून ते नियोजीत मार्गाने पेट्रोलपंपाकडे पाठविण्यात येतात.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande