सातारा, 12 सप्टेंबर (हिं.स.)। जर्मनीतील हँनोव्हर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या DEAF जागतिक शूटिंग स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या प्रांजली प्रशांत धुमाळने भारताचे प्रतिनिधीत्व करीत १० मीटर एअर पिस्टल वैयक्तीक क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम प्रस्थापित करुन अंतिम सामन्यामध्ये चौथा क्रंमाक संपादन करुन, तसेच मिक्स इव्हेंटमध्ये रौप्य पदक पटकावले असून, २५ मीटर स्पोर्ट पिस्टल वैयक्तिक क्रीडा प्रकारात पुन्हा जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित करुन फायनलमध्ये युक्रेनच्या स्पर्धकांबरोबर अटीतटीच्या सामन्यात कास्य पदक मिळवत भारत देशाबरोबर महाराष्ट्रासह सातारा जिल्हयाचा नावलौकीक संपूर्ण जगामध्ये वाढवला आहे.
प्रांजली धुमाळ हीने दोन पदकांसह उत्तम कामगिरी करुन मुलींच्या पिस्टल विभागात पदक तालिकेत जागतिक अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने