भंडारा : रेशनच्या तांदुळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
भंडारा, 16 सप्टेंबर (हिं.स.)। गोर गरीब लोकांना दोन वेळच जेवण मिळाव म्हणून शासनाच्या वतीने रेशन दिल जात. बऱ्याच धनाढ्य लोकांना रेशन मिळतं असल्याने हा तांदूळ न खाता व्यापाऱ्याला विकाला जातो. तो तांदूळ व्यापाऱ्या मार्फत रीसायकलाईन करून परत रेशन दुकानात
भंडारा : रेशनच्या तांदुळाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला


भंडारा, 16 सप्टेंबर (हिं.स.)। गोर गरीब लोकांना दोन वेळच जेवण मिळाव म्हणून शासनाच्या वतीने रेशन दिल जात. बऱ्याच धनाढ्य लोकांना रेशन मिळतं असल्याने हा तांदूळ न खाता व्यापाऱ्याला विकाला जातो. तो तांदूळ व्यापाऱ्या मार्फत रीसायकलाईन करून परत रेशन दुकानात पोहचवला जातो. हा गोरख धंदा अनेक वर्षापासून सुरू आहे. यावर अनेक कारवाया देखिल झाल्या. मात्र, हा प्रकार थांबता थांबत नाही.

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड वरून रेशनचा तांदूळ ट्रक मध्ये भरुन गोंदियाला जात असताना पोलिसांनी ट्रकला पकडून कारवाई केली. यात रेशनचा फोर्टिफाईड तांदूळ आढळून आला असुन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande