लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून कर्नाटकच्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्यास पाठवून तिचे लग्न मोडले. याप्रकरणी अंकित देसिंग राठोड (वय २५, रा. निंबा
संग्रहित


सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून कर्नाटकच्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्यास पाठवून तिचे लग्न मोडले. याप्रकरणी अंकित देसिंग राठोड (वय २५, रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजयपूर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने (वय २०) फिर्याद दिली आहे. अंकित हा शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास होता. तेथेच शिकणाऱ्या फिर्यादीशी त्याची ओळख, त्यानंत मैत्री झाली. दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते सोशल मीडिया व संदेशाद्वारे संवाद साधत होते. फेब्रुवारी महिन्यात फिर्यादीच्या वाढदिवशी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने त्याने तिला शहरातील बसस्थानक परिसरात बोलावले. तिला लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तेथून जाताना त्याने तिला मोबाईल व सिमकार्ड भेट म्हणून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande