ससून रुग्णालयात 4 कोटी 18 लाख 62 हजारांचाअपहार
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ससून सर्वोपचार रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केला . या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य
Sasoon pune news photo


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)। ससून सर्वोपचार रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केला . या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य २३ सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिली आहे. ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आली होती. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली. वैद्यकीय संचालनालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली. माने आणि चाबुकस्वार यांना सह्यांचे अधिकार दिले होते. त्याचा गैरवापर करून अधिष्ठाता यांची मान्यता नसताना अकाउंटंट आणि रोखपाल यांनी ससूनच्या बॅंक खात्यातून स्वत:च्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपये जमा केले. तसेच, आर्थिक अपहार करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande