सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड
सातारा, 19 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या वतीने खेलो इंडीया ही योजना प्रतिभावंत खेळाडु तयार व्हावेत म्हणुन देशभर राबविली जाते. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या योजनेर्तंगत जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती श
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड


सातारा, 19 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या वतीने खेलो इंडीया ही योजना प्रतिभावंत खेळाडु तयार व्हावेत म्हणुन देशभर राबविली जाते. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या योजनेर्तंगत जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती शाहु क्रिडा संकुल सातारा येथे सुरु आहे. जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ४ व ५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत जिल्हास्तर खेलो इंडिया अँथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू सहभागी होऊन पुणे बालेवाडी येथे ११ खेळाडुचीं राज्यस्तर ॲथलेटिक्स सपर्धेसाठी निवड झाली आहे.

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंचे नितीन तारळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी सातारा यांनी अभिनंदन करून राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande