अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या दिव्या शिंदेची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेकरिता निवड
अहमदनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूर्णपणे वाव देताना अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धां मध्ये चमकले असून नुकतेच अंडर १९ वयो
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या दिव्या शिंदेची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धे करिता निवड


अहमदनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूर्णपणे वाव देताना अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धां मध्ये चमकले असून नुकतेच अंडर १९ वयोगटात ३००० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये दिव्या विजयकुमार शिंदे हिने रौप्य पदक मिळवले असून तिची राष्ट्रीय ॲथलेटिक्ससाठी निवड झाली आहे.

माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलने स्पोर्ट ऍक्टिव्हिटी,कल्चरर ऍक्टिव्हिटी आणि गुणवत्ता ही त्रिसूत्री जपताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्ण वाव दिला आहे.कोल्हापूर येथे झालेल्या सीबीएससी क्लस्टर ९ ॲथलेटिक स्पर्धा २०२४- २५ या स्पर्धेत अंडर १९ वयोगटात ३००० मीटर रनिंग स्पर्धेमध्ये दिव्या शिंदे हिने रौप्य पदक मिळवली आहे.या स्पर्धे मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता येथे रनिंग,थ्रोइंग,जम्पिंग असे विविध क्रीडा प्रकार संपन्न झाले.दिव्याला आरोग्य पदक मिळाली असून तिची 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या यशाबद्दल संस्थेमध्ये तिचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली अमृतवाहिनी शिक्षण संस्था आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून गुणवत्तेमुळे देशात नाव झाले आहे.विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.विविध स्पर्धांमध्ये आत्मविश्वास पूर्ण सामोरे जाताना अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande