मोदी सरकारमुळे खेळाडूंना प्रोत्साहन - प्रभाकर सावंत
कुडाळ मध्ये पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात पुरुष गटातून १४८ तर महिला गटातून ३२ खेळाडू सहभागी सिंधुदुर्ग, 28 सप्टेंबर (हिं.स.)। भाजप हा सर्वस्पर्शी काम करणारा पक्ष आहे. मोदी सरकारमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे असे प्रतिपादन सि
पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन करताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.


कुडाळ मध्ये पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात पुरुष गटातून १४८ तर महिला गटातून ३२ खेळाडू सहभागी

सिंधुदुर्ग, 28 सप्टेंबर (हिं.स.)। भाजप हा सर्वस्पर्शी काम करणारा पक्ष आहे. मोदी सरकारमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगून पुढील काळात भाजप सर्व खेळांच्या पाठीशी आहे असे सांगितले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे पालकमंत्री राज्य मानांकन स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजपा सरचिटणीस रणजीत देसाई, राजू राऊळ, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष सुहास गंवडळकर, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, बंड्या सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, प्रदिप भाटकर, यतीन ठाकूर, कबड्डी खेळाडू छाया पवार, कार्यकारिणी सदस्य संतोष चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधीर भणगे, उपाध्यक्ष सुनील धुरी, शुक्राचार्य म्हाडेश्वर, सावंतवाडी माजी सभापती संदीप गावडे, अमोल खानोलकर, मुख्य पंच सुर्यकांत पाटिल, अमेय पेडणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले की या देशातील खेळाडूंना मोदी सरकार स्थापन झाल्यापासून प्रोत्साहन मिळत आहे भाजप पक्ष हा सर्व स्पर्शी पक्ष आहे तर राजकारण करणे एवढेच नाही तर प्रत्येक घटकाला सामावून घेऊन त्या माध्यमातून उभारणी करणे हे काम भाजप करत आहेत खेळाडूंना सध्या प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे या ठिकाणी कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे हे आयोजन पालकमंत्री चषक या नावाने असून पुढील काळात कोणी पालकमंत्री असो त्यांना हाच चषक आयोजित करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगून या खेळाच्या चळवळीला आमचा कायम पाठिंबा असणार आहे असे त्यांनी सांगितले तर यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले की कुडाळमध्ये यापूर्वी राष्ट्रीय स्थळ कॅरम स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली होती मुळात कोणत्याही खेळाची वाढ झाली पाहिजे तर त्या ठिकाणी खेळाडू निर्माण झाले पाहिजे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅरम चे खेळाडू तयार होत आहेत पुढील काळात सर्वांनी यासाठी सहकार्य केले तर हे खेळाडू नावलौकिक मिळवून देऊ शकतात असे त्यांनी सांगितले दरम्यान या स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये १४८ तर महिला गटामध्ये ३२ खेळाडू खेळत आहेत. विश्वविजेता संदीप दिवे, योगेश परदेशी, माजी विश्व विजेता प्रशांत मोरे, आशिया कप विजेता महम्मद घुफ्रान हे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुरुष गटात पुण्याच्या अनिल मुंढे याला तर महिला गटात मुंबईच्या काजल कुमारी हिला पहिलं मानांकन देण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरला या स्पर्धेची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande