सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण आणि दिक्षा चव्हाण उपउपान्त्य फेरीमध्ये
पालकमंत्री चषक तिसरी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा उद्या पुरुष महिलांचे अंतिम फेरी सामने होणार सिंधुदुर्ग, 29 सप्टेंबर (हिं.स.)। कुडाळमध्ये मध्ये सुरु असलेल्या पालकमंत्री चषक तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला आणि पुरुष गटाती
तिसऱ्या राज्य मानांकन पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुरु असलेले सामने.


पालकमंत्री चषक तिसरी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

उद्या पुरुष महिलांचे अंतिम फेरी सामने होणार

सिंधुदुर्ग, 29 सप्टेंबर (हिं.स.)। कुडाळमध्ये मध्ये सुरु असलेल्या पालकमंत्री चषक तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला आणि पुरुष गटातील उप उपांत्य फेरीचे स्पर्धक निश्चित झाले. उद्या शनिवारी या स्पर्धेच्या उप उपांत्य फेरी सह, उपांत्य आणि अंतिम फेऱ्या होणार आहेत. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा अनेक रोमहर्षक सामने कॅरम रसिकांना बघायला मिळाले. सिंधुदुर्गवासीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महिला गटातून सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण आणि दीक्षा चव्हाण यांनी उप उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे पालकमंत्री राज्य मानांकन स्पर्धा खेळविण्यात येत आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते या कॅरम स्पर्धेचं उदघाटन झालं होत. कॅरम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १६ कॅरम बोर्डवर एकूण ५ सेशन खेळविण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमधे अनेक नामांकीत खेळाडूंनी पुढील फेरीत प्रवेश केला होता.

आज पुन्हा पुढील फेरीचे सामने सकाळी सुरु झाले. त्यामधून दिवसभराचा निकाल पुढे आला आहे. यामध्ये पुरुष गटात सागर वाघमारे विजयी विरुद्ध निलांश चिपळूणकर 23/4 25/6, विकास धारिया विजयी विरुद्ध जलालुद्दीन मुल्ला 25/00 24/11, मोहम्मद घुफ्रांन विजयी विरुद्ध प्रफुल्ल मोरे 23/6 25/15, झैद अहमद विजयी विरुद्ध दिनेश केदार 25/9 25/1, योगेश परदेशी विजयी विरुद्ध मंगेश पंडित 21/16 25/18, पंकज पवार विजयी विरुद्ध संदीप दिवे 23/16 21/25 23/4, आणि प्रकाश गायकवाड विजयी विरुद्ध कुणाल राऊत 25/0 11/12 19/6, संजय मांडे विजयी विरुद्ध नरसिंगराव सकारी 25/5 15/17 25/15 आणि महिलागटातून आकांक्षा कदम विजयी विरुद्द, चैताली सुवारे 15/20 25/12 25/08, मधुरा देवळे विजयी विरुद्ध प्रणिता आयरे 19/08 22/09, समृद्धी घाडीगावकर विजयी विरुद्ध उर्मिला शेंडगे 21/8 23/10, दीक्षा चव्हाण विजयी विरुद्ध स्वरा मोहिरे 21/15 22/5, प्राजक्ता नारायणकर विजयी विरुद्ध शोभा कामत 25/4 23/19, रिंकी कुमारी विजयी विरुद्ध पूर्वा केतकर 25/5 25/12, केशर निर्गुण विजयी vs मेधा मतकरी 21/19 25/12, हे सर्व विजयी खेळाडू उप उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आजच्या दिवसात अनेक मान्यवरांनी स्पर्धा स्थळी भेट दिली.

प्रदीर्घ कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १४८ तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पुरुष एकेरी गटात विद्यमान राज्य विजेत्या पुण्याच्या अनिल मुंढेला तर महिला एकेरी गटात विद्यमान राज्य विजेती मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. योगेश परदेशी, प्रशांत मोरे आणि संदीप दिवे या तीन विश्वविजेत्या सहित महम्मद घुफ्रान, प्रकाश गायकवाड, पंकज पवार, काजल कुमारी, आकांक्षा कदम सारख्या आंतर राष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी कुडाळ आणि सिंधुदुर्गातील कॅरम पेमींना मिळत आहे. शिवाय स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येत आहे. त्यामुळे घरबसल्या क्रीडा रसिक सामने पाहत आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून उद्या दुप्परी तीन वाजता महिलांची अंतिम फेरी तर सायंकाळी ५ वाजता पुरुष गटाची अंतिम फेरी होणार तेच आणि त्यानंतरच या स्पर्धेचे अंतिम विजेते कोण हे कळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande