अस्मिता खेलो इंडिया  वेस्ट झोन विमेन्स लीग राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा.
नाशिक, 3 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया)आणि खेलो इंडि
अस्मिता खेलो इंडिया  वेस्ट झोन विमेन्स लीग राष्ट्रीय ज्युदो स्पर्धा.


नाशिक, 3 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया)आणि खेलो इंडिया यांच्या अस्मिता खेलो इंडिया या उपक्रमाअंतर्गत आयोजित पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वुमन्स लीग ज्यूदो स्पर्धेच्या आजच्या तीसऱ्या दिवशी महाराष्ट्रासह, गुजराथ, राजस्थानच्या खेळाडूनी आक्रमक खेळ करून सुवर्णपदक पटकावले.

आज खेळल्या गेलेल्या कॅडेट गटात ७० किलो गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी हुकूमत गाजवत तीनही पदके आपल्या नांवे केले. या गटात प्रेक्षा बोरसे हीने सुवर्णपदक, श्वेता गंधवलेने रजत आणि अदिती टाकणे हीने कास्य पदक मिळविले. ५८ वजनी गटात महाराष्ट्राच्या अंजली बाभुळकर हीने अंतीम लढतीत आपल्याच महाराष्ट्राच्या जनिषा व्होराला पराभूत करून सुवर्ण पदक मिळविले. या गटात गुजराथच्या जान्हवी जतापरा आणि पलक वेकरिया यांना कस्य पदक मिळाले. ५२ किलो गटात महाराष्ट्राच्या भक्ती भोसले हीने आक्रमक खेळ करत सुवर्णपदक मिळविले. तर गुजरातच्या प्रियांशी बेन बरियाला रजत पदक मिळाले. तर वैष्णवी मोरे(महाराष्ट्र) आणि अर्शता चौहान (गुजराथ) यांना कास्य पदक मिळाले. ४०किलो गटात राजस्थानच्या ज्योती सैनी आणि महाराष्ट्राच्या वैभवी आहेर यांच्यात खेळल्या गेलेल्या चुरशीच्या अंतीम लढतीत वैभवी आहेरला केवळ एक गुणाने पराभव स्वीकारावा लागला. या गटात महाराष्ट्राच्या स्नेहल देवरे आणि छतीसगडच्या हेंबाती नाग यांना संयुक्त ब्रांझ पदक मिळाले. ४८ किलो गटात शिवानी धोकर (राजस्थान) हीने सुवर्ण, अनुष्का पवार(महाराष्ट्र) हीने रजत पदक मिळविले. ४४ किलो गटात राही घेलानी आणि दिव्या मकवाना (दोघीही गुजराथ) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रजत पदक मिळविले, तर हंसिका वाडेकर (महाराष्ट्र) आणि जागृती बरीका(गुजराथ) यांना संयुक्तं ब्रांझ पदक मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजराथ, गोवा, मध्य प्रदेश आणि दीव - दमण अश्या सात राज्यांच्या ८९४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. पारितोषिके - या स्पर्धेमध्ये विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना ४ लाख सव्वीस हजार रुपये रोख पारितोषिके, आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय भोसले, शैलेश टिळक, योगेश धाडवे, रवींद्र मेटकर, योगेश शिंदे, विजय पाटील, स्वप्नील शिंदे, वाघचौरे, सुहास मैंद त्यांचे सर्व सहकारी आणि राष्ट्रीय पंच, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande