धामणी पंचक्रोशीचा ‘साहेब चषक 2025’ ठाण्यात रंगणार
ठाणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणी पंचक्रोशी येथील माजी विद्यार्थी सेवा संस्था (रजि) च्या वतीने श्रीमान. आर. जी. काते स्मृतिचिन्हार्थ ‘साहेब चषक 2025’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोज
धामणी पंचक्रोशीचा ‘साहेब चषक 2025’ ठाण्यात रंगणार


ठाणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणी पंचक्रोशी येथील माजी विद्यार्थी सेवा संस्था (रजि) च्या वतीने श्रीमान. आर. जी. काते स्मृतिचिन्हार्थ ‘साहेब चषक 2025’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी ठाण्यात करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणत क्रिकेटची रंगत वाढवणारा आर. जी. काते साहेब चषक 2025 हा क्रीडामहोत्सव बेडेकर महाविद्यालयाच्या टर्फ मैदानावर पार पडणार असून, स्पर्धेला माजी विद्यार्थी, माजी विधार्थिनी, पालक आणि स्थानिक क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८ वाजता, तर बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मा. श्री. विकास रेपाळे आणि माजी क्रिकेटपटू मा. श्री. श्रावण( भाई ) तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आर. जी. काते विद्यामंदिरचे स्थानिक स्कुल समिती चेअरमन श्री अजय बिरवटकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री. ह .स. खताते आणि शाळेचे सल्लागार श्री. अंकुशशेट काते यांच्या उपस्थितीनेही कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.

माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या पुढाकारातून होत असलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील क्रीडावृत्ती, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढविणारी ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात स्पर्धा करण्याची संधी मिळणार असल्याने स्पर्धेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

विजेत्या संघाला ९,९९९ रुपये, तर उपविजेत्या संघाला ७,७७७ रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर या व्यक्तिगत गटांमध्येही खेळाडूंना विशेष चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र गटातील विजेत्या संघालादेखील चषक देण्यात येणार असून, सर्वोत्कृष्ट कॅच घेणाऱ्या खेळाडूस विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande