एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुळ वेतनात 6500 रुपये वेतनवाढीचे आश्वासन मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.) : वेतनवाढीसाठी सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) संप आज, बुधवारी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुळ वेतनात (बेसीक पे) 6500 रुपयांच्या वाढीचे आश्वासन
एसटी बस लोगो


मुळ वेतनात 6500 रुपये वेतनवाढीचे आश्वासन

मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.) : वेतनवाढीसाठी सुरू असलेला राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) संप आज, बुधवारी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुळ वेतनात (बेसीक पे) 6500 रुपयांच्या वाढीचे आश्वासन मिळाल्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीने हा संप मागे घेतल्याचे जाहीर केलेय. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करण्यात आलेय.

गणेश उत्सवाच्या तोंडावरच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केल्यामुळे गावी जाणाऱ्या भक्तांना मोठे संकट निर्माण झाले होते. गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना एसटीने संप मागे घेतल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एसटी आजपासून संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी वेतनवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ड्युटीवर जाण्याचे आवाहन केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande