रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : जाकादेवी खालगाव (ता. रत्नागिरी) येथील बाजारपेठनजीक राहणाऱ्या सौ. रंजना थोरात (वय ७३ वर्षे) या १ सप्टेंबर रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता झाल्या आहेत.
रंजना थोरात १ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडल्या. त्यानंतर दुपारनंतर त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. जाकादेवीसह इतर परिसरात त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा संजय थोरात यांनी आपली आई बेपत्ता असल्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे. सौ. थोरात यांच्याविषयी माहिती मिळाल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे किंवा संजय थोरात यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर