रत्नागिरी, 1 जानेवारी, (हिं. स.) : हातीस येथील बाबरशेख क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. हे या शिबिराचे नववे वर्ष होते.
यावेळी महेश तोडणकर, रूपेश (बाळू) नागवेकर, अनिकेत नागवेकर, रोहन ठावरे, बंटी नागवेकर, अक्षय नागवेकर, पारस आंबुलकर, दीपाली रसाळ, मयूर तोडणकर आदी उपस्थित होते. रक्तदात्यांना मंडळाकडून विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी अनिकेत सुभाष नागवेकर, राजेश विश्वनाथ नागवेकर, प्रशांत मनोहर नागवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. आकांक्षा पाचपुते, डॉ. विनोद जाधव यांच्याकडून बाबरशेख क्रीडा मंडळाचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हातीस ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष संदेश नागवेकर, सौ. प्रेरणा नागवेकर, सुमित गोवेकर, सुहास, सुदर्शन, सुयोग, समिल नागवेकर आणि क्रीडा मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर