राष्ट्रीय महामार्गावरील निंभी, पुसला टोल नाक्याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी 
अमरावती 4 जानेवारी (हिं.स.) नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर मोर्शी वरूड तालुक्यात निंभी येथील टोल नाका सुरू केला असून पुसला येथील टोल नाका सुरू
शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील निंभी, पुसला येथील टोल नाक्याची भूमिका स्पष्ट करावी !


अमरावती 4 जानेवारी (हिं.स.)

नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असतांनाही वरूड मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावर मोर्शी वरूड तालुक्यात निंभी येथील टोल नाका सुरू केला असून पुसला येथील टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हजारो नागरिकांचे बळी घेऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नींभी, पुसला येथील टोल नाका खासगी चार चाकी वाहनांना टोल मुक्त करण्याबाबत शासनाने आपली भुमिका स्पष्ट करून मोर्शी वरूड तालुक्यातील दोन्ही टोल नाके टोल मुक्त न केल्यास मोर्शी वरूड तालुक्यात जन आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत रुपेश वाळके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला आहे.

नांदगावपेठ मोर्शी वरूड पांढूर्णा राष्ट्रीय महामार्गावरून हजारो नागरिक रोज मोठ्या संख्येने अमरावती - पांढूर्णा ये-जा करीत असतांना नांदगावपेठ येथील टोल नाक्यावर ८ किलोमिटर करीता शेकडो रुपये टोल वसुल करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत असतांना आता पुन्हा नींभी, पुसला येथे टोल नाका सुरू करून वाहन धारकांची लूट होणार असल्यामुळे निंभी, पुसला येथील टोल नाका खासगी चार चाकी वाहनांसाठी व शेतकऱ्यांच्या शेातमाल वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाने त्वरित घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निंभी येथील टोल नाका, सुरू केल्यामुळे नागरिकांना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे नियमाप्रमाणे ७० किलो मीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित असेल तरच टोल आकारता येतो. या महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतांनाही जाणीवपूर्वक टोल आकारला जाणार असेल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचे मत ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande