चंद्रपुरात खाण क्षेत्राजवळ वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघांचे दर्शन
चंद्रपूर, 4 जानेवारी (हिं.स.)। वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाण क्षेत्राजवळ वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघ दिसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागास यावर तातडीने कारवाई करण्यास सांगितले गेले आहे. चंद्रपूर शहराजवळील
चंद्रपुरात खाण क्षेत्राजवळ वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघांचे दर्शन


चंद्रपूर, 4 जानेवारी (हिं.स.)।

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाण क्षेत्राजवळ वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाघ दिसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागास यावर तातडीने कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.

चंद्रपूर शहराजवळील हिंदुस्थान लालपेठ खाण आणि वांसडी वन परिक्षेत्रांतर्गत पैनगंगा खाणीत रात्रीच्या सुमारास वाघ दिसल्याने दहशतीचे वातावरण आहे.

चंद्रपूरमधील हिंदुस्थान लालपेठ खुल्या खाणीच्या ‘ओव्हरबर्डन डंप’जवळ गुरुवारी रात्री वाघ दिसला. अनेक जणांना त्याचे दर्शन झाले. खाणीच्या आवारात बसविण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमध्येही हे कैद झाले आहे.दुसरीकडे एक दिवस आधी म्हणजे बुधवारी वणी येथील पैनगंगा खाणीजवळील ‘ओव्हरबर्डन डंप’जवळ वाहन चालकांना एक वाघ दिसला होता. काहींनी परिसरात फिरणाऱ्या वाघाचे छायाचित्रे देखील काढले.

व्याघ्र दर्शनाने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, यावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. वेकोली अधिकाऱ्यांनी वनविभागाला खाणींमध्ये आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांन होणारा धोका बघता प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याची विनंती वनविभागाला केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande