मियाझाकी व कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा
टोकियो, 13 जानेवारी (हिं.स.) : जापानमध्ये सोमवारी 13 जानेवारी रोजी रात्री 9.19 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. जापानच्या हवामान खात्याने या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.9 इतकी असल्याचे सांगितले. दरम्यान या भूकंपामुळे अद्याप कुठल्याही जिवित हानीचे वृत्त नाही.
यासंदर्भात जापानच्या हवामान खात्याने सांगितले की, या भूकंपानंतर जापानच्या मियाझाकी आणि कोची प्रांतांना त्सुनामीचा धोका आहे. त्सुनामीच्या लाटा एक मीटरपर्यंत पोहोचू शकतात. भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल कोणतेही वृत्त अद्याप मिळालेले नाही. जपान ज्वालामुखीच्या चाप, रिंग ऑफ फायर आणि पॅसिफिक बेसिनमधील फॉल्ट लाइन्सच्या शेजारी असल्याने वारंवार भूकंप होत असतात.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे