दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत अडकलेल्या १०० कामगारांचा मृत्यू
प्रिटोरिया, 14 जानेवारी (हिं.स.) : दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील 100 कामगारांच्या मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. हे सर
दक्षिण आफ्रिके


प्रिटोरिया, 14 जानेवारी (हिं.स.) : दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील 100 कामगारांच्या मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. हे सर्व कामागार सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन करत होते. तिथे अनेक कामगार अडकले होते. आता या कामागारांचा भूकेने तडफडून मृत्यू झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेन शहराजवळील बफेल्सफोंटेन याठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणींमध्ये सुमारे १०० कामगार अडकले होते. खाणीत अडकलेल्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि पाण्याचा पुरवठा बंद होता. जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा ते भूकेने आणि तहानेने मरण पावले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या घटनेची माहिती कामगारांनी मोबाईल फोनद्वारे पाठवलेल्या व्हिडिओवरून मिळाली, ज्यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह दिसत आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माइनिंग अफेक्टेड कम्युनिटीज यूनाइटेड इन एक्शन ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २६ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून १८ मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र, खाण इतकी खोल आहे की आत अजूनही सुमारे ५०० कामगार अडकले असण्याची शक्यता आहे.खाणीची खोली २.५ किमी असल्याचे सांगितले जाते. या घटनेत पोलिस आणि कामगारांमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला. पोलिसांनी खाण सील करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कामगारांमध्ये संताप उसळला. अटकेच्या भीतीमुळे कामगार बाहेर येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर कामगारांचा आरोप आहे की पोलिसांनी त्यांचे दोरखंड काढून टाकले ज्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, कामगारांचा मृत्यू प्रामुख्याने उपासमारीमुळे झाला. खाणीत अन्न-पाण्याचा पुरवठा थांबवण्यात आल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे अवैध खाणींचा धोका आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या दुर्घटनांकडे लक्ष वेधले गेले आहे. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून खाण व्यवस्थापनावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande