कॅलिफोर्निया , 15 जानेवारी (हिं.स.)।लॉस एंजिल्समध्ये आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आतापर्यंत 40 हजार एकरांचा परिसर आपल्या आवाक्यात घेतला आहे. यामुळे 12 हजार पेक्षा जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत.तर किमान २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आगीनंतर पुन्हा जोरदार वारे येण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पाण्याचे टँकर आणि मोठ्या संख्येने अग्निशमन दल पाठविण्यात आले आहे.
जंगलातील दोन मोठ्या आगींमध्ये या भागातील हजारो घरे नष्ट झाली. गेल्या आठवड्यात दोन भीषण आगीच्या घटनांनंतर पाण्याचे स्रोत आटल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर पाठवण्यात आले. हवामान शास्त्रज्ञांनी वारे अधिक तीव्र होतील असा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकांनी आग विझवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी उच्च जोखीम असलेल्या भागातील रहिवाशांना धोका वाटत असल्यास घरे सोडण्याची सूचना केली असून, औपचारिक स्थलांतर आदेशांची वाट पाहू नये, असा सल्ला दिला आहे. आगीमुळे आतापर्यंत ४० हजार एकर वरील जंगल जळून खाक झाले असल्याचे सांगण्यात आले. ही आग अमेरिकेच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि विनाशकारी आग आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode