रत्नागिरी : रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने हेल्मेट जनजागृती फेरी
रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : छत्तिसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती फेरी काढण्यात आली होती. फेरीची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पोलीस अधीक्षक धनंजय
रत्नागिरी : रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने हेल्मेट जनजागृती फेरी


रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : छत्तिसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती फेरी काढण्यात आली होती. फेरीची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अजित ताम्हणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

या फेरीमध्ये सुमारे १०० मोटारसायकलधारकांनी सहभाग घेतला. फेरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून शांतीनगर नाचणेमार्गे मारुती मंदिर, जयस्तंभ येथून पुन्हा मारुती मंदिर, साळवी स्टॉप मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या मार्गावरून निघाली. फेरीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मोटारसायकलधारकांचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रक्तदान शिबिरही पार पडले. शिबिरामध्ये ६० दात्यांनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande