पालघर, 17 जानेवारी (हिं.स.)।
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिन हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खाशाबा जाधव यांच्यासारखे ऑलिम्पिकवीर पालघर जिल्हयातून घडतील अशी मला खात्री असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी केले.
राज्य क्रीडा दिनानिमित्त पालघर येथे क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन नरळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुले व मुली क्रॉसकंट्री, बॅडमिंटन, कबड्डी व हॉलीबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने