नागपूर , 4 फेब्रुवारी (हिं.स.)।भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यासाठी टीम इंडियाने नागपुरात वन डे मालिकासाठी सराव सुरु केला आहे. अशातच संघाचा भाग नसताना अचानक वरुण चक्रवर्ती टीम इंडियासोबत नागपूरला पोहोचला आहे.यावरून वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
वरुण चक्रवर्ती नागपुरात टीम इंडियासह नेट प्रॅक्टिस करताना दिसला. नागपूरच्या प्रॅक्टिस पिचवर केएल राहुलला गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची नजर होती.वरुण चक्रवर्ती नागपुरात टीम इंडियासोबत सराव करत असल्याने काही संकेत मिळत आहेत. वरुण चक्रवर्तीने अद्याप वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केलेलं नाही. पण त्याने टी20 मालिकेत केलेली कामगिरी नाकारता येणार नाही. वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा सध्या तरी भाग नाही. पण लवकरच त्याचा समावेश संघात होऊ शकतो अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. वरुण चक्रवर्तीने टी20 मालिकेत इंग्लंडविरुद्ध जोरदार कामगिरी केली होती. या पाच सामन्यात 14 विकेट घेत प्लेयर ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता.विजय हजारे ट्रॉफीतही वरुण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली होती. वरुण चक्रवर्तीने तामिळनाडूसाठी एकूण 6 सामने खेळले आणि 18 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 5 रन प्रतिओव्हर होता. इतकंच काय दोन वेळा पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला. लिस्ट ए 23 सामन्यात वरुण चक्रवर्तीने 59 विकेट घेतल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode