मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे -  रोहन घुगे
ठाणे, 17 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन पलावा सिटी, कल्याण येथे करण्यात आला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व क्रीडा क्षेत्रातील टेबल टेनिसपटू शिवप्रिया
Thane


ठाणे, 17 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन पलावा सिटी, कल्याण येथे करण्यात आला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व क्रीडा क्षेत्रातील टेबल टेनिसपटू शिवप्रिया यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्वांना केले. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी नवीन खेळांचे आयोजन करण्यात आले असून 18 विविध मैदानी खेळ तसेच इनडोअर गेम (बैठे खेळ) यांचे नियोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी उत्तम केले असल्याने कौतुक केले. तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.‌

प्रकल्प संचालक धायादेवी शिसोदे यांनी क्रीडा स्पर्धा व कलाविष्कार अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी महत्त्वाचे असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन खेळांचा आनंद घ्यावा, अशा शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करून खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच रोजच्या कामाचा ताण विविध खेळ खेळून आनंद व्यक्त करण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे प्रास्ताविक करताना म्हणाले की क्रीडा महोत्सव आयोजित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक व बँक ऑफ बडोदा यांच्या सौजन्याने उत्तम नियोजन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी करणे शक्य झाले आहे. तसेच सर्व विभाग प्रमुख यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. सर्वांनी सहभाग नोंदवण्यासाठी व खेळांचे आनंद घेण्यासाठी आवाहन केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री. प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख संदिप चव्हान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख संदिप चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

क्रीडा महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खोखो, बॉक्स क्रिकेट, लंगडी, रस्सी खेच हे खेळ सांघिक खेळ असून वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, गोळा फेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्कवॅश, कॅरम, बुध्दीबळ, संगीत खुर्ची, जलतरण अशा स्पर्धां घेण्यात आल्या.

क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा स्तर, तालुका स्तर, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी वर्ग व शिक्षक वर्ग सहभागी झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande