राहुल नार्वेकरांनी घेतले मातोंड येथील श्री सातेरी देवीचे दर्शन
सिंधुदुर्ग, 17 जानेवारी (हिं.स.)। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व मातोंड गावच्या वतीने दादा परब या
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सत्कार करताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि दादा परब.


सिंधुदुर्ग, 17 जानेवारी (हिं.स.)। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व मातोंड गावच्या वतीने दादा परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. नार्वेकर म्हणाले, आपण विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला योग्य न्याय देण्याच्या बाबतीत कार्य तत्पर राहीन. हे करत असताना माझ्या कोकणच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल तसेच कोकणसाठी पर्यावरणाला धोका न पोहोचवणारे पर्यटन व्यवसायाला तसेच इतर लहान उद्योगांना चालना देण्यासाठी आपण आपल्या पदाचा सर्वतोपरी उपयोग करणार असल्याची ग्वाही दिली.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सत्ता बदलाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा नुसार जो महत्वपूर्ण निर्णय दिला त्याची नोंद इतिहासात राहील व यापुढे ज्या प्रमाणे मागील शिंदे सरकार स्थापन झाले व पुन्हा देशात इतर कोणत्याही राज्यात असे सरकार आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्या वेळेला राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय सर्व राजकीय पक्षांना एक इशारावजा दिशा देणारा निर्णय आहे व दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande