अकोला - आगीच्या घटनेची मनपा आयुक्त यांच्याव्दारे पाहणी
अकोला, 14 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिका क्षेत्रातील गांधी रोड वर स्थित आशा स्टोअर, बाबा कलेक्शन, श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, सदगुरू गारमेन्ट, पूजा इलेक्ट्रिकल्स, साई फ्रेमिंग सेंटर ला काल रात्री आग लागली होती. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त सुनिल लहान
Photo


अकोला, 14 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिका क्षेत्रातील गांधी रोड वर स्थित आशा स्टोअर, बाबा कलेक्शन, श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, सदगुरू गारमेन्ट, पूजा इलेक्ट्रिकल्स, साई फ्रेमिंग सेंटर ला काल रात्री आग लागली होती. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त सुनिल लहाने यांनी घटना स्थळाची पाहणी केली व व्यापा-यांशी संवाद साधला. या दरम्यान मा.आमदार श्री वसंतजी खंडेलवाल यांनी मनपा आयुक्त यांना अग्निशमन विभागाच्या गाड्या उशीरा आल्याबाबत कळविले असता मनपा अग्निशमन अधिकारी यांनी मा.आमदार यांना सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी आमदार श्री खंडेलवाल यांनी अग्निशमन विभागात एक अतिरिक्त फोन क्रमांक कार्यानवीत करणे बाबत सुचना दिली.

यावेळी मनपा उपायुक्त विजय पारतवार, सहा.आयुक्त राजेश सरप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कथले, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी प्रवीण मिश्रा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, कनिष्ठ अभियंता राहूल राऊत आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande