नाशिकमध्ये लॅब टेक्निशियन, व्यावसायिकांची राज्यस्तरीय परिषद
नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)। ‘थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र’ हे ब्रीद घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्ष
नाशिकमध्ये आज लॅब टेक्निशियन, व्यावसायिकांची राज्यस्तरीय परिषद


नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)।

‘थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र’ हे ब्रीद घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) सकाळी ८.०० ते ५.३० या वेळेत गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन व व्यावसायिक यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून ७०० विद्यार्थी, लॅब टेक्निशियन आणि व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य पी. व्ही. रसाळ, आश्रय संस्थेचे मुख्य विश्वस्त दीपक नाईक प्रा. प्रकाश पांगम यांनी दिली.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, तर उद्घाटक म्हणून मविप्रचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत असतील. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम बागूल, चिटणीस दिलीप दळवी, परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य पी. व्ही. रसाळ, आश्रय संस्थेचे मुख्य विश्वस्त दीपक नाईक, संस्थापक सचिव प्रीती नाईक, आरोग्य सचिव प्रा. प्रकाश पांगम, परिषद सचिव तथा लेखक प्रा. संजय पवार, परिषद समन्वयक डी. एस. सूर्यवंशी, उपप्राचार्य आर. व्ही. पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या परिषदेत सहभागी झालेल्यांसाठी चहा, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था आश्रय ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. दीपक नाईक यांनी दिली.

तज्ज्ञांचे पाच परिसंवाद

या परिषदेत डॉ. सई नेमाडे (थॅलेसेमिया जनजागृती), अल्पिता पाटील (स्पेशल मायक्रोबायोलॉजी), डॉ. सुमंत कर्णिक (रक्तपेढी), डॉ. सुचेता गंधे (हिस्टोपॅथोलॉजी लॅबोरेटरी टेक्निक्स), प्रा. जयंत बर्वे (क्वालिटी कंट्रोल इन लॅबोरेटरी) या मान्यवरांचे परिसंवाद होणार आहेत.

दोन पुस्तकांचे प्रकाशन

या परिषदेत प्रा. प्रकाश पांगम यांचे ५० वर्षांच्या अनुभवांवर आधारित प्रा. संजय पवार लिखित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक ‘थॅलेसेमिया जनजागृती व सीबीसी तपासातील बारकावे’ या विषयावरील मराठी भाषेतील सर्व लॅब टेक्नीशियन्स व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच, ‘परिषदेचे सोविनियर’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande