नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)।मनमाड शहरातील आगार व्यवस्थापक हा गेंड्याच्या कातडीचा असून याला आम्ही सहा जानेवारी रोजी महिला व ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांबाबत निवेदन दिले होते. मात्र, या अधिकाऱ्याने आम्हाला दोन दिवसात काम करून देतो असे आश्वासन दिल्याने आम्ही तिथून निघून गेलो होतो. मात्र, या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांनी आज पंधरा दिवस होऊन गेले तरी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. याशिवाय ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या विरोधात उलट सुलट भाषेत बोलण्याचा प्रकार मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी केला असून या या आगार व्यवस्थापक व गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्याचा बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा व मनमाड शहर युनिट तर्फे जळजळीत निषेध करण्यात येत असून मंगळवारी 21 जानेवारी रोजी या अधिकाऱ्याच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष प्रवीण पगारे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI