दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने सुरूहोणार कॉलेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी दिल्ली विद्यापीठाअंतर्गत 2 संकुलाची पा
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर


पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संकुलाची पायाभरणी

नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी दिल्ली विद्यापीठाअंतर्गत 2 संकुलाची पायाभरणी करणार आहेत. यापैकी एका महाविद्यालयाचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने असेल.

दिल्ली विद्यापीठात पूर्व आणि पश्चिम असे 2 नवे कॅम्पस उभारले जाणार आहेत. यासंदर्भात 2021 मध्ये दिल्ली विद्यापीठाने निर्णय घेतला होता. त्यानुसार द्वारका आणि नजफगढ भागात 3 महाविद्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यात रोशनपुरा, नजफगढ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयचाही समावेश आहे, ज्यामध्ये शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा असतील. यासाठी 140 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर सुरजमल विहार परिसरात तयार होत असलेल्या शैक्षणिक संकुलासाठी 373 कोटी रुपये तर द्वारका भागातील शैक्षणिक संकुलासाठी 107 कोटी खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीबीएसईच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट्स येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधलेल्या 1675 सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबरोबर नौरोजी नगर येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सरोजिनी नगर येथील जीपीआरए टाईप-2 क्वार्टर्स या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande