नाशिक - पार्किंगच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिक , 21 जानेवारी (हिं.स.)।शहरामध्ये खुनाची मालिका सुरूच असून परत पंचवटीतील श्री केशवराजअपार्टमेंट मध्ये पार्किंगच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे ‌ नाशिक शहर आणि प
नाशिक - पार्किंगच्या वादातून मारहाणीत एकाचा मृत्यू


नाशिक , 21 जानेवारी (हिं.स.)।शहरामध्ये खुनाची मालिका सुरूच असून परत पंचवटीतील श्री केशवराजअपार्टमेंट मध्ये पार्किंगच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे ‌

नाशिक शहर आणि परिसरामध्ये सतत त्याने हत्या करण्याच्या घटना या सुरूच आहेत पंचवटीमध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी तिसरी हत्या करण्यात आलेली आहे तर नाशिक रोड परिसरामध्ये उपनगर येथील गंधर्व नगरीत एका बालकाची हत्या करण्यात आली. शहरातील खुनाची मालिका ही सुरूच आहे त्यामुळे आता शहरांमध्ये काहीच भीतीच वातावरण निर्माण झालेला आहे.

पंचवटी मध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी झालेल्या हत्या मिळालेल्या माहितीनुसार या परिसरातील हिरावाडी येथे असलेल्या श्री केशवराज अपार्टमेंट मध्ये राहणारे बुद्धन विश्वकर्मा यांचे अपार्टमेंटमधील काही नागरिकांशी पार्किंग मधील पार्क करण्यावरून वाद झाले होते या वादात दिनांक 20 रोजी सायंकाळच्या सुमारास काही जण विश्वकर्मा यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्या मुलालाही मारहाण केली आणि स्वतः बुद्धन विश्वकर्मा यांनाही मारहाण केली हि मारहाण झाल्यानंतर ते पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथे गेल्यानंतर तातडीने तक्रार न घेता तुम्ही सिव्हिलला जाऊन तपासणी करून अहवाल आणा असे सांगितल्यानंतर विश्वकर्मा हे आपल्या पत्नीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले आणि त्या ठिकाणी दरवाजावरती गेले असताना त्यांच्या डोक्याला लागलेल्या महाराणीतील दुखापतीमुळे रक्तस्राव वाढल्याने त्यांचा रुग्णालयाच्या दरवाजाचाच मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने रुग्णालय प्रशासन करून याबाबतची माहिती ही पंचवटी पोलिसांना देण्यात आली तर त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने

पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी संशयित वसंत निवृत्ती घोडे, ४७, कल्पना वसंत घोडे, ४६, विशाल वसंत घोडे, २४, गणेश वसंत घोडे, २७, सर्व रा. श्री केशव अपार्टमेंट, दामोदर राज नगर, हिरावाडी, पंचवटी, यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande