चंदनगुप्ता हत्याकांड : 28 जणांनाजन्मठेप
एनआयए विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा लखनऊ, 03 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या कासगंजमधील चंदन गुप्ता हत्याकांडातील 28 दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपींना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कासगंजमध्ये 26 जानेव
दिवंगत चंदन गुप्ता यांचा संग्रहित फोटो


एनआयए विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा

लखनऊ, 03 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या कासगंजमधील चंदन गुप्ता हत्याकांडातील 28 दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपींना 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कासगंजमध्ये 26 जानेवारी 2018 रोजी झालेल्या चंदन गुप्ता हत्याकांडातील 2 घांची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आलीय.

एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी सरकार विरुद्ध सलीम आणि इतर खटल्यात हा निकाल दिला. तसेच न्यायालयाने दोषी आरोपी बरकतुल्लाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आरोपींवर आयपीसी कलम 147, 148, 149, 341, 336, 307, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वसीम, नसीम, ​​मोहसीन, राहत, बबलू आणि सलमान यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान प्रतिबंधक कलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि शस्त्र कायद्याचे कलम 2/25 तर आरोपी सलीमलाही शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25/27 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी सलीम न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे.

कासगंजमध्ये, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि हिंदू वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी 26 जानेवारी 2018 रोजी तिरंगा यात्रा काढली होती, ज्यामध्ये मोटारसायकलवरून 100 हून अधिक लोकांनी तिरंगा यात्रा काढली होती. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असलेल्या कोतवाली भागातील बद्दुनगर येथे ही यात्रा पोहोचली. तिरंगा यात्रेला पुढे जाऊ न दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला, त्यानंतर दगडफेक सुरू झाली. काही मिनिटांनंतर दंगल उसळली, ज्यात चंदन गुप्ता यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण शहर दंगलीत बुडाले. परिस्थिती नियंत्रणात नसताना प्रशासनाला इंटरनेट सेवा बंद करावी लागली होती. -----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande