महात्मा
गांधी हिंदी विद्यापीठाचा स्थापना दिवस उत्साहात
वर्धा, 08 जानेवारी
(हिं.स.) : हिंदीला
भविष्यातील भाषा म्हणून विकसित करण्याची मोठी जबाबदारी हिंदी विद्यापीठाच्या
खांद्यावर असल्याचे प्रतिपादन पद्मश्री प्रो. हरमहेंद्र सिंग बेदी यांनी केले.
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 28 व्या स्थापना
दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बेदी यांच्या हस्ते लक्ष्मीबाई केळकर वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात
आले. याप्रसंगी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे
प्राध्यापक डॉ. इमरै बंघॉ, कार्य-परिषद सदस्य गोविंद सिंह, प्रो. कृपाशंकर चौबे, प्रो. गोपाल कृष्ण ठाकूर, डॉ. रामानुज अस्थाना आणि कुलसचिव प्रो. आनन्द
पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी
प्रो. हरमहेंद्र
सिंह बेदी हिंदीचे महत्त्व सांगताना म्हणाले की, जीटी रोड आणि हिंदी भाषा या दोन शक्ती आपल्या देशाला अखंड भारत बनवतात. संपूर्ण जगाने हिंदीसह
गांधीजींच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. गांधी आणि आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाची
ओळख जागतिक पटलावर निर्माण होत आहे. हिंदी ही आर्थिक सत्ता आणि व्यापाराची भाषा
बनली आहे. जगात ज्याप्रमाणे नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांचे नाव घेतले जाते,
त्याचप्रमाणे भविष्यातही हिंदी विश्वविद्यालयाचे
नाव घेतले जाईल आणि हे विश्वविद्यालय जगभर ज्ञानाचा दीप प्रकाशमान करेल असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष अतिथी डॉ. इमरै बंघॉ म्हणाले की हिंदी ही
मुगल साम्राज्याची संपर्क भाषा राहिली आहे. भारतात हिंदीला विशेष स्थान आहे.
हिंदीची वाढती स्वीकृती आणि प्रभाव यावर भाष्य करताना त्यांनी हिंदीच्या
मर्यादेबद्दल खंतही व्यक्त केली. ते म्हणाले की आम्ही हिंदीचा आदर करतो पण त्याचा
वापर करत नाही. लोक इंग्रजीच्या मागे धावू लागले आहेत आणि लोकभाषा विसरत चालले
आहेत. मी हंगेरीचा रहिवासी असलो तरी गेल्या 38 वर्षांपासून मला हिंदीबद्दल आत्मीयता आहे. हिंदीमध्ये भावनात्मकता
मिळते आणि जेव्हा मी ते भारतात बोलतो तेव्हा मला घरी असल्या सारखे वाटते. ते
म्हणाले की भाषा जाणून घेऊन भाषांच्या सीमा वाढवता येतात.
कार्यकारी परिषद
सदस्य गोविंद सिंह यांनी सांगितले की या विश्वविद्यालयाशी सुरुवातीपासूनच जोडलो
आहे. हे विश्वविद्यालय केवळ 28 वर्षांचे आहे, म्हणजे बालपणात. आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. शिक्षक व
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विश्वविद्यालय भविष्यात स्मरणात राहील असे
शैक्षणिक कार्य करेल. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह पद्मश्री
प्रो. बेदी आणि डॉ. इमरै बंघॉ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की हिंदी हे
आमचे घर आहे. सर्व भारतीय भाषांशी संवाद साधून आपण पुढे जायला हवे, हाही हिंदी विश्वविद्यालयाचा मूळ उद्देश आहे.
स्थापना दिनानिमित्त त्यांनी विश्वविद्यालय परिवाराला शुभेच्छा देत विश्वविद्यालयाला
पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे असे सांगितले.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni