मालेगाव बांगलादेशी बनावट कागदपत्रं प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी 
- विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे अध्यक्षपदी नाशिक, 8 जानेवारी (हिं.स.) - मालेगाव मधील बांगलादेशच्या दिलेल्या दाखल्यासंदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती म्हणजे एसआयटीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा आदेश बुधवारी महाराष्ट्र शासन
मालेगाव बांगलादेशी बनावट कागदपत्रं प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी 


- विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे अध्यक्षपदी

नाशिक, 8 जानेवारी (हिं.स.) - मालेगाव मधील बांगलादेशच्या दिलेल्या दाखल्यासंदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती म्हणजे एसआयटीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे कक्ष अधिकारी आ.ज.गोरे यांनी काढले आहेत.

मालेगाव मध्ये बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळण्यासाठी म्हणून मालेगाव तहसील कार्यालय मालेगाव महानगरपालिका यांच्याकडून रेशन कार्ड व तहसील कार्यालयातील इतर कागदपत्रांसह मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने बनावट जन्मपत्र दिल्याचे प्रकरण भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणले होते या प्रकरणावरती त्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने एस आय टी चौकशीची स्थापना करण्याची मागणी केली होती.

सर्व प्रकरणाची दखल घेऊन राज्य शासनाने मंगळवारी गृह विभागाचे कक्ष अधिकारी आज गोरे यांच्या आदेशाने कार्यालयीन आदेश क्रमांक प्र.क्र. 02 / विदेशी 1 दिनांक 8 जानेवारी 2025 या देशाने विशेष तपास समिती म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे या प्रकरणाचा तपास आता एसआयटी मार्फत होणार असून या समितीचे अध्यक्षपदी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य म्हणून नगर विकास विभागाच्या नासिक आयुक्त कार्यालयातील सहयुक्त , नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव पदी मालेगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गृह विभागाच्या कक्षा अधिकारी गोरे यांनी काढलेल्या या पत्रामध्ये म्हटले आहे की या सर्व प्रकरणाचा तपास करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावयाचे आहे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना सुचविण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

या आदेशामुळे बांगलादेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची आता चौकशी सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande