गडचिरोली, 8 जानेवारी (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्य़ात 2 दुर्दांत महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.शामला झुरु पुडो ऊर्फ लीला आणि
काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी अशी या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. या दोघींवर पोलिसांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शामला पीसीपीएम सदस्य असून तिच्यावर 5.50 लाख रुपये आणि काजल ही भामरागड दलम सदस्य असून तिच्यावर 4.50 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही 23 सप्टेंबर 2014 रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. तीने 2002 मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून काम केले. कंपनी क्र. 4 मध्ये सन 2010 पर्यंत काम केले. आत्मसमर्पण करतेवेळी ती कंपनी क्र. 10 मध्ये सेक्शन कमांडर या पदावर कार्यरत होती. या कार्यकाळात तिच्यावर आजपर्यंत एकुण 45 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 21 चकमचकमक, 6 जाळपोळ, व 18 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी ही जानेवारी 2018 मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती तिचेवर 8 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 4 चकमकी 1 जाळपोळ, व 3 इतर गुन्हांचा समावेश आहे. आजपर्यंत एकुण 693 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond