अहिल्यानगर, 9 जानेवारी (हिं.स.):- स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धा २०२४-२५ साठी शहरातील श्रीरामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या प्रशिक्षिका आणि राष्ट्रीय पंच प्रणिता तरोटे आणि आप्पा लाढाणे यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धा १४ ते १८ जानेवारी दरम्यान कोल्हापूर येथील एबीपी शिक्षण समुह,नवे पारगाव (तालुका हातकणंगले) येथे होणार आहे.या स्पर्धेसाठी तरोटे आणि लाढाणे पंच म्हणून काम पाहणार आहे. प्रणिता तरोटे आणि आप्पा लाढणे हे योगासन आणि मल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू असून,आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी पंच आणि प्रशिक्षक पदाची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभळली आहे.सध्या ते नगर शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मल्लखांब,योगा आणि एरियल सिल्क या खेळाचे प्रशिक्षण देत आहे.त्यांच्या या निवडीबद्दल श्री रामावतार मानधना चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन मानधना,ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग, अक्षता गुंड पाटील,ऋतुजा वाल्हेकर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni