नाशिक, 12 ऑक्टोबर (हिं.स.)
: भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत आदिवासी विकास विभागाच्या मुंढेगांव (ता. इगतपुरी) येथील शासकिय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी गौरव संजय कातोरे याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेच्या १४ वर्षांखालील वयोगटात गौरवने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकविला. या कामगिरीच्या आधारे त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याला क्रीडाशिक्षक मंगेश गमे व वडील संजय कातोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे मुख्याध्यापक तनवीर जहागिरदार, क्रीडाविभाग प्रमुख दत्तात्रय पोटे यांच्यासह शिक्षक, अधिक्षक तसेच वर्ग चार कर्मचाऱ्यानी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV