बीडमध्ये शुक्रवारी होणाऱ्या महाएल्गार सभेत धनंजय मुंडे उपस्थित राहणार
बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) - बीड शहरात येत्या १७ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी समता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते मंत्री, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार सभेचे निमंत्रण मिळाले असून, आपण या एल्गार महासभेस उपस्थित रा
बीडमध्ये शुक्रवारी होणाऱ्या महाएल्गार सभेत धनंजय मुंडे उपस्थित राहणार


बीड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) - बीड शहरात येत्या १७ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी समता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते मंत्री, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या महा एल्गार सभेचे निमंत्रण मिळाले असून, आपण या एल्गार महासभेस उपस्थित राहणार असल्याचे माजी मंत्री तथा ओबीसी नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

समता परिषदेचे नेते तथा कार्यक्रमाचे आयोजक ॲड. सुभाष राऊत यांनी परळी येथे आपली भेट घेऊन सभेचे निमंत्रण दिले असून, मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधत या सभेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान मी मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या राज्याच्या सर्वोच्च सभागृहात व रस्त्यावरील लढाईत लढलो आहे. त्याचबरोबर बंजारा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज बांधवांच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी झालेलो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईत देखील मी सहभागी होणार असून, सकल ओबीसी समाजाने एकजुटीने या महा एल्गार सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून, याविषयी अधिक न बोलता मी माझी सविस्तर भूमिका ओबीसी समाजाच्या महा एल्गार सभेतून मांडेन, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

आपण कुणाच्याही विरोधात नाही, मात्र कुणाच्याही ताटातले हिस्कावले जाऊ नये, या मागणीच्या आपण पाठीशी असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande