परळी वैजनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर
बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्याअनुषंगाने या नव्या
परळी वैजनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर


बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्याअनुषंगाने या नव्या कार्यक्रमानुसार नागरिकांना १७ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार हरकती व सूचना ८ ते १३ ऑक्टोबर दरम्यान स्वीकारल्या जाणार होत्या. मात्र आयोगाच्या नव्या निर्देशांनुसार हा कालावधी वाढवून ८ ते १७ ऑक्टोबर असा करण्यात आला आहे. नागरिकांनी आपले नाव, पत्ता किंवा इतर दुरुस्तीसाठी संबंधित मुख्याधिकारी, नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यानंतर प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती परळी वैजनाथ नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दिली आहे. या सुधारीत कार्यक्रमामुळे मतदारांना आपले नाव योग्य प्रकारे नोंदवण्यासाठी व दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande