बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले
बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच, गट आणि गटातल्या गणिताची जुळवाजुळव करायला सुरूवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा संदर्भ लक्षात घेता मुंडे यांचे वर्चस्व जिल्हा परिषदेमध्ये नेहमीच राहिले प
अ


बीड, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच, गट आणि गटातल्या गणिताची जुळवाजुळव करायला सुरूवात झाली आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारणाचा संदर्भ लक्षात घेता मुंडे यांचे वर्चस्व जिल्हा परिषदेमध्ये नेहमीच राहिले परंतु या वेळेला नेमके काय होईल याची शाश्वती कोणी देत नाही बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव धारूर आष्टी पाटोदा आणि परळी या तालुक्यांमध्ये राजकीय समीकरण लक्षात घेता बीड जिल्ह्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे परंतु मुंडे काय करतात याकडे देखील लक्ष लागल आहे

दिवाळीनंतर निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होणार आहे. दरम्यान, गेवराई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा आहेत. सात जागा सर्व साधारण गटाला सुटल्या आहेत. त्यापैकी तीन जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. दोन जागा ओबीसी पुरूष व महिला गटासाठी सुटल्यात. राखीव गटाला एक ही जागा नाही.हक्काचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने, पुढाऱ्यांना सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात धावाधाव करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande