पंचगव्हाण फाट्यावर भीषण अपघात : एक ठार, पाच जखमी
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोला जिल्ह्यात पंचगव्हाण फाट्याजवळ भीषण अपघात झाला. शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांची इरटिका गाडी काल रात्री
प


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

अकोला जिल्ह्यात पंचगव्हाण फाट्याजवळ भीषण अपघात झाला. शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांची इरटिका गाडी काल रात्री साडेदहा वाजता च्या दरम्यान बुधवारी पलटी झाली. या दुर्घटनेत अक्षय म्हसाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात अनिकेत ढवळे, निखिल हिवराळे, अंकित खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमींना शासनाने मदत करावी, अशी मागणी नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत आहे. आनंदाच्या वातावरणात आलेल्या या दुर्घटनेमुळे तेल्हारा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande