सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळेच गोमातेस राज्य मातेचा दर्जा दिला – संजय चव्हाण
परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। वसुबारस सणाच्या निमित्ताने राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मा. संजय चव्हाण यांनी सहकुटुंब उपस्थित राहून गोमातेस पूजन केले. कार
भारतीय संस्कृतीत गोमातेस महत्त्व असल्यामुळेच शासनाने राज्य मातेचा दर्जा दिला – जिल्हाधिकारी संजय चव्हाण


परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। वसुबारस सणाच्या निमित्ताने राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मा. संजय चव्हाण यांनी सहकुटुंब उपस्थित राहून गोमातेस पूजन केले.

कार्यक्रमाला उपस्थित राहून जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, “भारतीय संस्कृतीत गोमातेचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. प्राचीन काळात ज्यांच्याकडे अधिक गोधन असे, तोच श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखला जात असे. संपत्तीची व्याख्या तेव्हा पैशावर नव्हे तर गोधनावरून ठरायची. आजही ‘काऊ कडलिंग’ सारख्या उपक्रमांमुळे गोप्रेमाची भावना शहरांमध्येही जागृत होत आहे. गोमातेचे A2 दूध हे आरोग्यवर्धक व ऊर्जावान असून नागरिकांच्या आरोग्यरक्षणासाठी आणि शेतीच्या टिकावासाठी गाय-आधारित शेती गरजेची आहे.”

ते पुढे म्हणाले की, राणीसावरगाव येथील गोशाळेत होत असलेली गोसेवा, नंदीसेवा व गोआधारित शेतीचे मॉडेल पाहून त्यांना अपार समाधान मिळाले असून कोरे कुटुंबाचे कार्य अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य १०८ डॉ. दिगंबर शिवाचार्य महाराज (वसमत) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande