परभणी - समाजकार्याचे प्रशिक्षणार्थी करणार बालविवाहाबद्दल जनजागृती
परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण आणि एस.बी.सी-3/युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उप परिसर परभणी येथे समाजकार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्
परभणी - समाजकार्याचे प्रशिक्षणार्थी करणार बालविवाहाबद्दल जनजागृती


परभणी, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण आणि एस.बी.सी-3/युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उप परिसर परभणी येथे समाजकार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम युवा शक्ती कार्यक्रम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बालविवाहाचे कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि बालविवाह व शिक्षण यांचा सहसंबंध आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 या बद्दल एस.बी.सी-3/युनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दि. 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये इंडिंग चाईल्ड मॅरेज चॅम्पियन्स, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, आय.सी.डी.एस विभाग आणि जिल्हा महिला बालविकास विभाग यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील बालविवाह होण्याची शक्यता आहे असे 50 हॉटस्पॉट गावाची यादी बनविण्यात आली होती. याच हॉटस्टॉप गावात बालविवाह निर्मूलनासाठी व बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृतीचे कार्यक्रम नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात युवकांच्या माध्यमातून राबविण्यास येणार आहे.

या गावात बालविवाह प्रतिबंधात्मक रॅली काढणे, गावात दर्शनी भागात पोस्टर चिटकविणे, मानवीसाखळी बनविने, सेवापुरवठेदार यांचे भेट घेऊन त्यांना बालविवाह प्रतिबंधात्मक माहिती देणे, बालविवाह बद्दल पथनाट्य सादर करणे, बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेणे, गाण्याच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधात्मक प्रबोधन करणे अशा विविध प्रकारे जनजागृती युवकांच्या माध्यमातून करण्यात येणार असून समाजकार्याचे प्रशिक्षणार्थी यासाठी सज्ज झालेले आहे.

आजच्या अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे उप-परिसर परभणी येथील संचालक प्रा. डॉ. पी.एस.वक्ते, समाजकार्य विभागातील प्रा.निलेश राठोड, प्रा.राजेश झगडे, प्रा.चंद्रशेखर राऊत तसेच वाणिज्य विभागातील प्रा.डॉ.एस.एस. सदाफुले, प्रा.डॉ.जे.आर.कोते,अजय भोसले, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande