पैगंबरांचा अपमान आणि पोलिसांची अन्यायी कारवाई थांबवा!
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। ​अलीकडील काळात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात झालेल्या निंदनीय घटना आणि त्यानंतर देशाच्या विविध भागांत पोलिसांनी केलेल्या अतिरेकी व अन्याय्य कारवाईचा ''कुल जमाती विफ़ाक़ (KJW), महाराष्ट्र'' या सर्वपक्षीय महासंघटनाने त
प


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

​अलीकडील काळात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात झालेल्या निंदनीय घटना आणि त्यानंतर देशाच्या विविध भागांत पोलिसांनी केलेल्या अतिरेकी व अन्याय्य कारवाईचा 'कुल जमाती विफ़ाक़ (KJW), महाराष्ट्र' या सर्वपक्षीय महासंघटनाने तीव्र निषेध नोंदवला आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याप्रती प्रेम व्यक्त केल्याबद्दल देशभरात अटक केलेल्या सर्व निर्दोष युवकांची आणि व्यक्तींची तत्काळ सुटका करण्यात यावी. हे भारतीय संविधानाने दिलेले धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे., सर्व धर्माच्या पूजनीय व्यक्तींच्या पवित्रतेचे रक्षण करणारा व धार्मिक निंदा (Blasphemy) रोखणारा तत्काळ लागू करण्यात यावा, जेणेकरून कायमस्वरूपी सामाजिक सौहार्द प्रस्थापित होईल., समाजात द्वेष, सांप्रदायिकता आणि फूट पाडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विषारी प्रचार करतात.

​भारत सरकारने या दुःखद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पाऊले उचलावीत आणि देशात शांतता, परस्पर आदर आणि ऐक्य टिकवून ठेवावे, अशी मागणी कुल जमाती विफ़ाक़, महाराष्ट्रचे अध्यक्ष ज़ियाउद्दीन सिद्दीकी यांनी राष्ट्रपती यांचेकडे केली आहे.

​कुल जमाती विफ़ाक़ (KJW) ही महाराष्ट्रातील मुस्लिम धार्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित विद्वान आणि विविध इस्लामी विचारसरणींच्या मान्यवर व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली एक महत्त्वपूर्ण महासंघटना आहे.​काही शहरांमध्ये केवळ 'I Love Muhammad' असे शांततेने लिहिलेले बॅनर्स व पोस्टर्स लावून आपल्या पैगंबरांप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केली, बॅनर्स काढले आणि त्यांना असंबंधित कायद्यांतर्गत अटक केली. हे अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ​पैगंबर मोहम्मद हे सर्व मुस्लिम समाजासाठी आई-वडिलांपेक्षाही, मुलांपेक्षाही आणि स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रिय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा होणारा अपमान देशातील शांतता व सौहार्द बिघडवतो, असे मत संघटनेने व्यक्त केले.​कानपूर (उत्तर प्रदेश) पासून सुरू झालेल्या आणि बरेली (उ.प्र.), अहिल्यनगर (महाराष्ट्र) तसेच इतर शहरांमध्ये पसरलेल्या या घटनांनी समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे. विशेषतः, बरेली येथील प्रख्यात इस्लामी विद्वान मौलाना तौकीर रझा खान यांच्या अटकेने मुस्लिम समुदायातील दुःख आणि रोष आणखी वाढला आहे. ​या गंभीर पार्श्वभूमीवर, कुल जमाती विफ़ाक़ महाराष्ट्र या संघटनेने आपल्या मागण्या राष्ट्रपतीकडे सादर केल्या आहेत. यावेळी 1. मौलवी तुफैल अहमद नदवी साहब (सदर कुल जमाती तंजीम), मुफ्ती वाजिद,. मौलवी मुजफ्फर,. मौलवी ताहिर,

मुफ्ती शाहनवाज़, सादिकत नदवी,. काशिफ जमाल खान, सैयद सुहैल मोहम्मद कलीम अयाज़ खान,तनवीर खान,राहील इस्माईल

,इब्राहीम टाटा यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande