आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जारी..
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तयारीला गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्
P


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तयारीला गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

पातूरसाठी उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे व तहसीलदार डॉ. राहूल वानखडे, अकोटसाठी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, तर मूर्तिजापूरसाठी डॉ. संदीपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांची नियुक्ती झाली आहे.

अकोला पंचायत समिती क्षेत्रात डॉ. शरद जावळे व सुरेश कव्हळे, बाळापूरसाठी निखिल खेमनार व वैभव फरतारे, बार्शिटाकळीकरिता महेश परंडेकर व राजेश वझिरे, तर तेल्हाऱ्यासाठी समाधान सोनवणे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande